अविराेध ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST2021-01-08T05:53:06+5:302021-01-08T05:53:06+5:30

मेहकर : तालुक्यातील मोहना खुर्द रत्नापूर गट ग्रामपंचायत अविरोध झाली असून, शिवसेना कार्यालयात नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात ...

Undisputed Gra. Pt. Reception of members - A | अविराेध ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार - A

अविराेध ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार - A

मेहकर : तालुक्यातील मोहना खुर्द रत्नापूर गट ग्रामपंचायत अविरोध झाली असून, शिवसेना कार्यालयात नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी विकास निधीची घोषणा केली होती. त्यानुसार मोहना खुर्द व रत्नापूर वासी यांनी एकमत करून सात जागांसाठी सातच अर्ज भरले. नंतर सर्व नवनिर्वाचित उमेदवार व गावकरी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आले. तिथे युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, उपसभापती सुपाजी पायघन, साहेबराव बोबडे यांनी अविराेध विजयी उमेदवार मंदा शिंदे, नंदाबाई म. टाले‌, डिगांबर मेटाने, सुरेखा प्रमोद वानखेडे, अरुणा समाधान ताकतोडे, छाया लक्ष्मण मुळे, किरण संतोष वायाळ यांचा सत्कार केला. या वेळी किसन चोंडकर, गजानन चवरे, भीमराव सरदार, लक्ष्मण मुळे, अशोक शिंदे, रेवती शेळके, प्रमोद वानखेडे, गजानन लाटे, समाधान ताकतोडे, पांडुरंग ताकतोडे, गणेश टाले, विठ्ठल शिंदे, सुधाकर वानखेडे, कैलास मुळे, श्याम जोशी, विलास आखाडे, पिटू भुंजवटराव आदी उपस्थित होते.

Web Title: Undisputed Gra. Pt. Reception of members - A