अपघातात दोन महिला पोलीस जखमी
By Admin | Updated: May 7, 2017 02:18 IST2017-05-07T02:18:42+5:302017-05-07T02:18:42+5:30
तरवाडी फाट्याजवळ स्कुटी घसरुन झालेल्या अपघातात दोन महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या.

अपघातात दोन महिला पोलीस जखमी
नांदुरा (जि. बुलडाणा): तरवाडी फाट्याजवळ स्कुटी घसरुन झालेल्या अपघातात दोन महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. हि घटना शनिवार ६ मे रोजी सकाळी ८.३0 वाजेच्या सुमारास घडली. या दोघींना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
शनिवारी जळगाव जामोद तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने पोलीस बंदोबस्तासाठी बुलडाणा येथून स्वाती कडुबा वाणी (२७) व अश्विनी साहेबराव जाधव (२६) या दोन महीला पोलीस कर्मचारी जळगावकडे स्कुटीने निघाल्या. मात्र नांदुरानजिक तरवाडी फाट्याजवळ कुत्रा आडवा आल्याने स्कुटी घसरली. यामध्ये जखमी झालेल्या या दोघींवर सर्वप्रथम नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात करण्यात आले.