चिखलीत दुचाकी चाेरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST2020-12-26T04:28:02+5:302020-12-26T04:28:02+5:30
चिखली : गत काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याची गंभीरतेने दखल घेत चिखली पोलिसांनी चालविलेल्या ...

चिखलीत दुचाकी चाेरटे गजाआड
चिखली : गत काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याची गंभीरतेने दखल घेत चिखली पोलिसांनी चालविलेल्या तपासकामास यश आले असून, चोरीस गेलेल्या चार दुचाकींसह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
चिखली शहरातून महेश अरविंद कठाले रा.गांधीनगर चिखली यांच्यासह दाेघांच्या तीन मोटरसायकली अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या हाेत्या. याबाबतची तक्रार १२ ऑगस्ट २०२० रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल होती. संबंधित चोरीस गेलेल्या वाहनांचा तपास हेड कॉन्स्टेबल शशिकांत धारकरी यांच्याकडे देण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना अमरावती येथे सदर मोटरसायकली असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.धारकरी, ना.पो.कॉ.रणजित हिवाळे, पो.कॉ. संदीप सोनुने, युवराज राठोड यांनी या गुन्ह्यातील मुद्स्सीर खान मोहम्मद युनूस, वय २२ वर्षे, रा. तारफैल अकोला आणि समीर खान मेहमूद खान वय २४ वर्षे, रा.अलकबिर नगर यवतमाळ, या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या जवळून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींच्या चौकशीतून या व इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता असून यानुषंगाने पोलिसांनी दोन्हीही आरोपींचा दोन दिवसांचा पीसीआर सुद्धा मिळविलेला आहे.