दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; २ ठार

By Admin | Updated: October 27, 2016 03:25 IST2016-10-27T03:25:33+5:302016-10-27T03:25:33+5:30

झोटींगा फाट्याजवळ अपघात.

Two wheelers hit by unknown vehicle; 2 killed | दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; २ ठार

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; २ ठार

सिंदखेडराजा, दि. २६ -साखरखेर्डा येथून मलकापूर पांग्रा येथे जाणार्‍या मोटार सायकलला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दोन जन ठार झाले. ही घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा घडली. साखरखेर्डा येथून मलकापूर पांग्रा येथे अरुण प्रभू मांजरे आणि शंकर अंबादास काकडे हे दोघे मोटार सायकलने मलकापूर पांग्रा येथे जात असताना झोटींगा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. घटना स्थळावर तातडीने ग्रामस्थ धावून गेले. मात्र अज्ञात वाहनाने तेथून पोबारा केला. साखरखेर्डा पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आह

Web Title: Two wheelers hit by unknown vehicle; 2 killed