दुचाकीची ट्रकला धडक; पोलीस ठार, एक जखमी

By Admin | Updated: August 5, 2016 00:20 IST2016-08-05T00:20:21+5:302016-08-05T00:20:21+5:30

बुलडाणा - चिखली मार्गावरील घटना; पोलीस घटनास्थळीच ठार.

Two wheelers hit; Police killed, one injured | दुचाकीची ट्रकला धडक; पोलीस ठार, एक जखमी

दुचाकीची ट्रकला धडक; पोलीस ठार, एक जखमी

चिखली (जि. बुलडाणा), दि. ४ - बुलडाणा - चिखली मार्गावर गुरुवारी रात्री ७.३0 वाजेदरम्यान दुचाकीने ट्रकला मागच्या बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलडाणा येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले वामन लहाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
बुलडाणा येथे पोलीस मुख्यालयात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले वामन लहाने एमएच २८ - वाय - ९१११ क्रमांकाच्या अँक्टीव्हाने पत्नीसह चिखली येथे जात होते. रात्री ७.३0 वाजताच्या दरम्यान रस्त्यावर उभा असलेल्या एमएच १९ - २ - २0९७ क्रमांकाच्या ट्रकला त्यांनी मागून धडक दिली. यामध्ये लहाने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नीला उपचारासाठी बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: Two wheelers hit; Police killed, one injured