नालीवर आदळून दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:32 IST2020-10-14T11:32:10+5:302020-10-14T11:32:36+5:30
Khamgaon Accident News वळणाच्या रस्त्यावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले.

नालीवर आदळून दुचाकीस्वार ठार
खामगाव : शेगाव पंढरपूर वारी मार्गावरील आवार गावातील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने नालीवर आदळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. जळगाव खान्देश जिल्ह्यातील रहिवासी करणसिंग राठोड ( २२, रा. पळसखेड काकड, तालुका जामनेर) हा युवक दुपारी त्याची दुचाकी क्रमांक एमएच-१९- १८९१ ने मेहकरकडे जात होता. आवार गावातील वळणाच्या रस्त्यावर अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तो रोडच्या कडेला असलेल्या नालीवर जाऊन आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी सुनील राऊत हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले.