भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग

By अनिल गवई | Updated: March 23, 2023 15:23 IST2023-03-23T15:22:19+5:302023-03-23T15:23:12+5:30

पूज्य सिंधी पंचायतच्यावतीने गुरूवारी सकाळी झुलेलाल नगर भागातून या रॅलीला सुरूवात झाली.

Two wheeler rally on the occasion of Lord Jhulelal Jayanti participation of Sindhi community members in the rally | भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग

भगवान झुलेलाल जयंती निमित्त दुचाकी रॅली, सिंधी समाज बांधवांचा रॅलीत सहभाग

खामगाव: भगवान झुलेलाल जयंती निमित्त गुरूवारी सकाळी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीला सिंधी समाज बांधवांनी सहभाग घेतला. या रॅलीचे खामगाव शहरात विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

पूज्य सिंधी पंचायतच्यावतीने गुरूवारी सकाळी झुलेलाल नगर भागातून या रॅलीला सुरूवात झाली. ‘आयो लाल झुलेलाल’ असा जषघोष करीत रॅलीने शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केले. या रॅलीमध्ये सिंधी समाजाचे ज्येष्ठ नागरिक,युवक-युवती व महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनीही झुलेलाल जयंतीनिमित्त रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक किशोर भोसले, अध्यक्ष रोहित राजपूत उपस्थित होते.

Web Title: Two wheeler rally on the occasion of Lord Jhulelal Jayanti participation of Sindhi community members in the rally