अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST2021-09-16T04:43:22+5:302021-09-16T04:43:22+5:30

शेख रशीद शेख हसन हे मलकापूर पांग्रा येथे गेले असता परत येताना दुचाकी एमएच २३ डी ८९९९ या ...

Two-wheeler killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

शेख रशीद शेख हसन हे मलकापूर पांग्रा येथे गेले असता परत येताना दुचाकी एमएच २३ डी ८९९९ या क्रमांकाच्या दुचाकीला सावखेड नागरे गावाला लागूनच अपघातात शेख रशीद जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले.

ही माहिती अंढेरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शेख रशीद यांना रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अंढेरा पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, वाहन शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले असून, ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पोहेकाॅ. गजानन वाघ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in collision with unknown vehicle