ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; महिला ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:23 IST2021-02-23T11:22:55+5:302021-02-23T11:23:05+5:30
Accident News ही घटना २२ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता माळवंडीजवळ घडली.

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; महिला ठार, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सराइ : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने अन्वा येथील ३२ वर्षीय महिला ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता माळवंडीजवळ घडली.
भाेकरदन तालुक्यातील ग्राम अनुवा पाडा येथील गणेश सोनुने हे पत्नी अनितासोबत दुचाकी एमएच २१ ८६४० ने बुलडाणा तालुक्यातील ग्राम साखळी येथे सासूरवाडीत श्राद्धच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने येत हाेते. दरम्यान, माळवंडीजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जखमी झाले. दाेघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनिता गणेश सोनुने यांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकाविद्ध गुन्हा दाखल केला आहे.