दाेन दुचाकींची धडक, दाेन जण ठार; टेंभुर्णी येथील घटना
By संदीप वानखेडे | Updated: March 6, 2024 18:05 IST2024-03-06T18:04:56+5:302024-03-06T18:05:39+5:30
मृतकामध्ये सरपंच पतीचा समावेश

दाेन दुचाकींची धडक, दाेन जण ठार; टेंभुर्णी येथील घटना
संदीप वानखडे, सिंदखेडराजा : दाेन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाल्याने दाेन जण ठार झाले. ही घटना ५ मार्च राेजी रात्री जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. सिंदेखडराजा तालुक्यातील आंचली येथील सरपंच पतीचा मृतकामध्ये समावेश आहे.
अंचली येथील सरपंच पती चरणसिंग राजपूत (लखवाळ ४२) हे आपले सहकारी मित्र संतोष ब्रम्हणावत यांचे सोबत एका कार्यक्रमासाठी टेंभुर्णी परिसरात गेले होते. मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते मोटारसायकलने घरी परतत असताना टेंभुर्णी गावातील मुख्य रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकलवर समोरून येणारी अन्य एक मोटारसायकल आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, चरणसिंग राजपूत प्रवास करीत असलेल्या मोटारसायकलने पेट घेतला. यात चरणसिंग व त्यांचे सहकारी संतोष ब्रम्हणवत हे दोघे भाजले गेले तर भतोडी, जाफराबाद येथील अंकुश रमेश शेळके हे शंभर फूट लांब फेकले गेले. या अपघातात चरणसिंग राजपूत व अंकुश शेळके हे दोघे जागीच ठार झाले. तर संतोष ब्राम्हणांवर व शरद उगले हे दोघे गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी अंचली येथे चरणसिंग राजपूत यांच्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.