अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर जखमी
By संदीप वानखेडे | Updated: July 10, 2024 19:37 IST2024-07-10T19:36:19+5:302024-07-10T19:37:07+5:30
मंगेश चेके हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ३६४५ ने गावाकडे जात हाेते. यावेळी त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर जखमी
देऊळगाव राजा : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक गंभीर जखमी झाला. ही घटना १० जुलै राेजी चिखली रोड वरील आळंद फाटा गणपती मंदिर जवळ घडली. मंगेश अरविंद चेके रा. वाकी बु. असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
मंगेश चेके हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ३६४५ ने गावाकडे जात हाेते. यावेळी त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सतीश नागरे करीत आहेत.