दोन दुचाकींचा अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 22:50 IST2020-10-14T22:48:57+5:302020-10-14T22:50:41+5:30
Buldhana Accident बुलढाणा ते चिखली मार्गावर झाला अपघात.

दोन दुचाकींचा अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भरधाव दोन दुचाकींचा अपघात होऊन दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता चिखली रस्त्यावर घडली. दिलीप संपत इंगळे (४५) रा. येळगाव, स्वप्नील चंदन हिवाळे (२४) रा.पांगरी असे मृतकांची नावे आहेत. बुलडाणा चिखली रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम. एच. २०, सी. क्यू. ६०१४ व एम. एच. २८, ए. आर. ९६६१ यांचा अपघात झाला. यामध्ये दिलीप इंगळे व स्वप्नील हिवाळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठिवले. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या इसमावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीसांनी आकस्मीक मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.