शिवनी-अरमाळ मार्गावर दुचाकी अपघात; युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:51 IST2017-11-10T00:49:07+5:302017-11-10T00:51:29+5:30
लोणार : शिवनी अरमाळकडे जाताना दुचाकी स्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातामध्ये राहुल गुंजाळ (२४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुलतानपूर मार्गावर वडगाव तेजन गावानजीक हा अपघात झाला.

शिवनी-अरमाळ मार्गावर दुचाकी अपघात; युवक जखमी
लोणार : शिवनी अरमाळकडे जाताना दुचाकी स्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातामध्ये राहुल गुंजाळ (२४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुलतानपूर मार्गावर वडगाव तेजन गावानजीक हा अपघात झाला.
एम.एच.२८.ए.एफ.५0३३ या दुचाकीने तो लोणारहून शिवनी अरमाळकडे जात असताना अचानक त्याचा वाहनावरून तोल गेल्याने वडगाव तेजन गावानजीक तो दुचाकीवरून खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, मार्गस्थ नागरिकांनी लगोलग १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका पाचारण केली. त्यामुळे राहुलवर वेळेत उपचार होऊ शकले. राहुल वैयक्तिक कामासाठी लोणार येथे आला होता. दुपारी साडेबारा वाजता अपघात झाला.
शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गाचे सध्या काम वेगाने होत आहे; परंतु या मार्गावर ठीकठिकाणी माती, दगड पडलेले आहेत, तर काही ठिकाणी गड्डे पडलेले आहेत. यामुळे चारचाकी वाहन समोरून आले की दुचाकीस्वाराचा तोल जाण्याचे प्रकार घडून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. असाच प्रकार ९ नोव्हेंबरला घडला.