अमडापूर हद्दीत दोन आत्महत्या

By Admin | Updated: March 13, 2016 02:06 IST2016-03-13T02:06:54+5:302016-03-13T02:06:54+5:30

दोन युवकांनी संपवली जीवनयात्रा; कारण अज्ञात.

Two suicides in Amadapur border | अमडापूर हद्दीत दोन आत्महत्या

अमडापूर हद्दीत दोन आत्महत्या

अमडापूर (बुलडाणा): अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या किन्ही सवडत व करणखेड या दोन गावांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटना ११ व १२ मार्च रोजी उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत किन्हीसवडत येथील अर्जुन नारायण शिंदे (३५) याने ११ मार्च रोजी सकाळी शेतातील झाडाला गळफा घेऊन आत्महत्या केली. तर दुसर्‍या घटनेत स्वत:च्या घरात गळफास घेऊन गजानन नारायण शेळके (३५) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी करणखेड येथे घडली. या दोन्ही प्रकरणात अमडापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two suicides in Amadapur border