वाहन उलटल्याने दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 15:02 IST2017-04-04T15:02:51+5:302017-04-04T15:02:51+5:30
शेगाव येथे येणा-या भाविकांचे वाहन उलटल्याने दोन जण ठार झाल्याची घटना खामगाव ते चिखली दरम्यान रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

वाहन उलटल्याने दोन जण ठार
खामगाव : श्रीराम नवमी उत्सवासाठी शेगाव येथे येणा-या भाविकांचे वाहन उलटल्याने दोन जण ठार झाल्याची घटना खामगाव ते चिखली दरम्यान रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. जाफ्राबाद तालुक्यातील सावरखेडा येथे भाविक मालवाहू मेट ॅडोरने शेगाव येथे श्रीराम नवमी उत्सवासाठी येत होते. लोखंडा ते नायदेवी दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मेट ॅडोर उलटले. यामध्ये सविता राजू वायाळ (वय ४५) व नामदेव शेनफड वायाळ (वय ६०) हे दोन जण ठार झाले. तसेच सात ते आठ जण जखमी झाले. घटनेनंतर जखमींना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.