वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाट्यावर१४० गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली. यामध्ये एक इसम घटनास्थळी ठार झाला असून, एक गंभीर जखमी झाल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रामेश्वर बाबुराव टोपरे हे अकोट वरून MH 28 AW 6124 क्रमांकाच्या मोटरसायकल ने वानखेड कडे जात होते. तर अर्जुन शहादेव पहुरकर हे MH 28 W 5313 मोटारसायकल ने वानखेड वरून भिलखेड जात असताना वानखेड फाट्याजवळ दोघांची अमोरासमोर धडक झाली. यात रतन उर्फ अर्जुन शहादेव पहुरकर वय ३८वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तर रामेश्वर बाबाराव टोपरे वय ३५ हा गंभीर जखमी झाला . मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली व 1 मुलगा असा आप्त परिवार आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी तांमगाव पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारी वरून अ. प.१५२/१८ कलम ३०४ अ,३३८,४२७ नुसार टोपरे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक एक ठार ; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 13:40 IST
वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाट्यावर१४० गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली.
दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक एक ठार ; एक गंभीर
ठळक मुद्देरामेश्वर बाबुराव टोपरे हे अकोट वरून MH 28 AW 6124 क्रमांकाच्या मोटरसायकल ने वानखेड कडे जात होते.अर्जुन शहादेव पहुरकर हे MH 28 W 5313 मोटारसायकल ने वानखेड वरून भिलखेड जात होते.वानखेड फाट्यावर१४० गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाली.