Two killed as truck hits two-wheeler | ट्रकची दुचाकीस धडक, दोन जण ठार

ट्रकची दुचाकीस धडक, दोन जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

अंढेरा : अज्ञात ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने दाेन जण ठार झाले . ही घटना मलकापूर-सोलापूर महामार्गावरील आंचरवाडी फाट्याजवळ १ मार्च राेजी घडली. भगवान शेणफड परिहार व गजानन बबन शिंदे दोघे रा. आंचरवाडी असे मृतकांची नावे आहेत. भगवान शेणफड परिहार व गजानन बबन शिंदे दोघे रा. आंचरवाडी हे चिखलीवरुन दुचाकी क्र. एमएच.२८- एएल ९८०९ ने गावाकडे जात हाेते. दरम्यान, आंचरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यामध्ये दाेघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ पुढील उपचारासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चिखली ग्रामीण रुग्णालयात दाेन्ही जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राजवंत आठवले यांच्यासह पोलीस कर्मचारी समाधान झिने,विकास देशमुख (बापू)एहसान सय्यद,घटनास्थळी दाखल झाले हाेते. महामार्गाच्या अर्धवट कामामुळे गत काही दिवसांपासून अपघातात वाढ झाली आहे. राजूर घाटात लागली आग, वनसंपदेचे झाले नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शहराला लागून असलेल्या राजूर घाटात रविवारी रात्री अंधार होताच आग लागली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अथक प्रयत्न करून आग विझविण्यात आली. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवार वसलेले आहे. शहराला लागून ही रांग जाते व त्याला राजूर घाट असे नाव दिलेले आहे. याच राजूर घाटातून बुलडाणा-मलकापूर मार्ग जाताे. २८ फेब्रुवारी रोजी घाटातील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात आग लागली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली. आग पाहून या मार्गाने जाणारे काही पर्यावरणप्रेमी थांबले व त्यांनी आपआपल्या परीने वनविभाग, अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्याची वाट ना बघता, बुलडाणा येथील पत्रकार मयूर निकम, अमोल घुले, विकास दौंड, आशिष खडसे व श्रीकांत पैठणेसह अजून काही लोक रात्रीच्या अंधारात या डोंगरदऱ्यात आपला जीव धोक्यात टाकून उतरले व आग विझवू लागले. काही वेळानंतर बुलडाणा अग्निशमन दल, वनविभागाचे कर्मचारी, फायर फाइटर व पोलीस मदतीला धावून आले. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Web Title: Two killed as truck hits two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.