खामगाव-चिखली मार्गावर दोन अपघातात दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:22 AM2021-02-24T11:22:27+5:302021-02-24T11:24:15+5:30

Khamgaon-Chikhali road accident पहिला अपघात हा कव्हाळा फाट्यानजीक तर दुसरा अपघात उंद्री-लालमाती नजीक घडला.

Two killed in Khamgaon-Chikhali road accident |  खामगाव-चिखली मार्गावर दोन अपघातात दोन जण ठार

 खामगाव-चिखली मार्गावर दोन अपघातात दोन जण ठार

googlenewsNext
ठळक मुद्देदत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत.गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर: चिखली-खामगाव मार्गावर २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये दोघे जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला  आहे. यातील पहिला अपघात हा कव्हाळा फाट्यानजीक तर दुसरा अपघात उंद्री-लालमाती नजीक घडला.
पहिला अपघात कव्हाळा फाट्यानजीक एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झाला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. दुसरा अपघात हा एका मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ईसोली येथील दत्तात्रय श्रीराम शेळके (४८) व विष्णू मुरलीधर शेळके (दोघे  रा. ईसोली) हे कव्हाळा येथे दुचाकीवर जात असताना शेगाव-पुणे (एमएच-१३-सीयू-६९२७) या बसची दुचाकीला जबर धडक बसली. त्यात दत्तात्रय शेळके हे जागीच ठार झाले तर विष्णू शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रामभाऊ तुळशीराम शेळके (रा. ईसोली) यांनी दिली.
दरम्यान, दुसरा अपघात उंद्री गावानजीक लालमातीजवळ घडला. उंद्री येथील रहिवासी गोविंद रामराव नसवाले हे लालमातीकडून उंद्रीकडे दुचाकीवर (क्रमांक एमएच-२८ एक्स-६७६६) जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (क्र. एमएच-२७-एक्स-७७८४) दुचाकीला जबर धडक दिली. त्यात  गोविंद नसवाले हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती श्रीकांत भास्करराव राऊत (३५, रा. उंद्री) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली. 

Web Title: Two killed in Khamgaon-Chikhali road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.