शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:04 IST

खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते.

अमडापूर : कार अपघातात दोन जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान  चिखली-अमडापूर मार्गावर घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून  वर्तविण्यात येत आहे.  जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते. दरम्यान बुधवारी पहाटे सात वाजताच्या दरम्यान अमडापूरनजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (वय ५०) व प्रीती विलास बहुरुपे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (वय ६० ), स्रेहल श्रीकांत भोजने (वय २७ ), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातChikhliचिखलीhighwayमहामार्ग