दुचाकी अपघातात दोन ठार

By Admin | Updated: March 22, 2016 00:27 IST2016-03-22T00:02:31+5:302016-03-22T00:27:16+5:30

पिंपळनेर : बीड तालुक्यातील मैंदा पोखरी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे ठार झाले. एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण सोडले.

Two killed in a bike accident | दुचाकी अपघातात दोन ठार

दुचाकी अपघातात दोन ठार


पिंपळनेर : बीड तालुक्यातील मैंदा पोखरी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे ठार झाले. एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने उपचारादरम्यान प्राण सोडले.
शिवाजी निर्मळ (वय ४० रा. मैंदा ता. बीड) व किशोर गावडे (वय २० रा. धुनकवड ता. धारुर) अशी मयतांची नावे आहेत. उमेश पवार (रा. धुनकवड) व पिनू हाडे (रा. मैंदा) यांचा जखमींत समावेश आहे. दोन्ही दुचाकीवरील प्रत्येकी एक मयत झाला. गावडे व पवार हे दुचाकी क्र. (एमएच २३- आर- १०९४) वरुन बीडहून धारुरकडे परतत होते. मैंदाफाटीजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकी (क्र. एमएच २३- एजी- ३६४९) शी जोरदार धडक झाली. किशोर गावडे याचा जागीच मृत्यू झाला तर निर्मळने उपचारादरम्यान प्राण सोडले. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद नव्हती. (वार्ताहर)

Web Title: Two killed in a bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.