खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात दोन गटात हाणामारी, ४ जण गंभिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST2018-01-16T23:30:45+5:302018-01-16T23:54:50+5:30
बोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य तिघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात दोन गटात हाणामारी, ४ जण गंभिर
आॅनलाईन लोकमत
बोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये 2 व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य दोघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बोरी अडगाव येथे जुन्या प्रकरणावरुन काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार व रोशन टिकार हे दोघे गंभिर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार व अच्युत टिकार हे दोघे सुध्दा जखमी झाले आहेत. या दोघांना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने गावातील तणाव निवळला. याप्रकरणी खामगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.