दोन गटात हाणामारी; सहा जखमी,दोन गंभीर
By Admin | Updated: August 1, 2014 02:21 IST2014-08-01T01:59:25+5:302014-08-01T02:21:00+5:30
खामगाव येथील घटना

दोन गटात हाणामारी; सहा जखमी,दोन गंभीर
खामगाव : जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना स्थानिक गुरांच्या बाजारात आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये ६ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.
चिंचपूर येथील बबन बाजीराव मोहिते ३५, विलास आश्रू मोहिते २६, आश्रू बाजीराव मोहिते ४२, शांताबाई दादाराव मोहिते ५५ हे गुरांच्या बाजारात म्हशी विकायला आले होते. यावेळी उंद्री नागझरी येथील प्रल्हाद बाबुराव मोहिते २४ व अंकुश नारायण मोहिते २९ यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. यामध्ये दोन्ही गटात हाणामारी होवून सर्वजण जखमी झाले. घटनेबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तेथे येवून सर्व जखमींना उपचारार्थ स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान बबन मोहिते व अंकुश मोहिते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.