रेल्वे कर्मचाऱ्यासह दोघांचा रेल्वे गाडीच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 19:25 IST2021-05-13T19:22:24+5:302021-05-13T19:25:33+5:30
Train Accident News : दोघांचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चांदूरबिस्वा स्टेशन नजिक घडली.

रेल्वे कर्मचाऱ्यासह दोघांचा रेल्वे गाडीच्या धक्क्याने मृत्यू
ठळक मुद्देचांदूरबिस्वा रेल्वे स्थानकावरील घटनाऊन बाजूने येणाऱ्या मालगाडीने उडविले
हिंगणे गव्हाड (जि बुलडाणा): रेल्वेत कार्यरत काटेवाला (पाॅइंटसमन)व अन्य एक असा दोघांचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना १२ मे रोजी रात्रीच्या सुमारास चांदूरबिस्वा स्टेशन नजिक घडली.
पाॅइंटसमन म्हणून कार्यरत माणिक रामभाऊ हिवराळे (५९,रा. डिघी) हे रेल्वेचे काम करीत असताना, त्यांना डाऊन बाजूने येणाऱ्या मालगाडीने उडविले, त्यात त्यांचा मृत्यू झाला, त्याचवेळी श्रीराम जवाहरलाल दसोरा (४५, धंदा मजुरी, रा.चांदूरबिस्वा) यांचा चांदूरबिस्वा येथे रेल्वे मालगाडीचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला