रस्त्यासाठी दोन कोटीचा प्रस्ताव
By Admin | Updated: September 15, 2014 01:07 IST2014-09-15T00:58:09+5:302014-09-15T01:07:20+5:30
बुलडाणा जिल्हाधिका-यांनी घेतली एकफळ गावाची दखल

रस्त्यासाठी दोन कोटीचा प्रस्ताव
फहीम देशमुख/शेगाव
पावसाळ्यात तालुक्याशी रस्त्याअभावी संपर्क तुटणार्या एकफळ या गावाची व्यथा लोकमतने प्रकाशित करताच जिल्हाधिकार्यांनी याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस् त्यासाठी दोन कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करून मागविले आहे.
शेगाव तालुक्यातील एकफळ या गावाला तालुक्याला जोडणारा रस्ता उपलब्ध नसून, पाऊस आला की या गावाचा संपर्क तुटतो. ही बाब लक्षात घेता लोकमत चमूने या गावात जाऊन तेथील नागरिकांची व्यथा मांडली. याची दखल घेत दुसर्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या गावास भेटी देऊन रस्त्यातील अडथळे कसे दूर होतील याबाबत टिपण्या घेतल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी शेगावात बैठक आयोजित केली.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्यांनी लोकमतच्या वृत्तावर अधिकार्यांशी चर्चा केली व ही बाब खरी आहे काय, याची शहानिशा केली. यावर सा.बां. विभागाच्या अधिकार्यांनी एकफळ या गावाला खरोखरच रस्ता नाही व रस्ता उपलब्ध करावयाचा असल्यास त्याला दोन पूल आणि भूसं पादनाची प्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी रस्त्यासाठी अपेक्षित असलेला निधी व याबाबतचा आराखडा तत्काळ आपल्याकडे सादर करावा त्याला मंजुरात देण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
एकफळ व कुरखेड या गावांना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केलेला आहे. शिवाय नेत्यांना प्रचारासही बंदी घातली आहे. शेगाव तालुक्यातील या दोन गावांपैकी एकफळ हे खामगाव तर कुरखेड गाव हे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात येते. येथील लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.; मात्र आता जिल्हाधिकार्यांनी या गावाची दखल घेतल्याने या गावांना तालु क्याशी जोडणारा व हक्काचा रस्ता पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.