मेहकर-मालेगाव मार्गावर दोन कंटेनर व दुचाकीचा अपघात; तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 15:54 IST2020-11-01T15:51:23+5:302020-11-01T15:54:18+5:30
Accident on Mehkar-Malegaon Road मेहकर-मालेगाव मार्गावर दोन कंटेनर व एका दुचाकीचा विचित्र अपघात होवून तीन जण ठार झाले.

मेहकर-मालेगाव मार्गावर दोन कंटेनर व दुचाकीचा अपघात; तीन ठार
ठळक मुद्देदुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.तिघांची अद्याप अेाळख पटलेली नाही.
डोणगाव: मेहकर तालुक्यातील नागापूर नजीक मेहकर-मालेगाव मार्गावर दोन कंटेनर व एका दुचाकीचा विचित्र अपघात होवून तीन जण ठार झाले आहेत. एक नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरील तीनही जणांचे पार्थिव पोलिसांनी उचलून मेहकर येथील रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोबतच या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करीत आहे. अपघातात ठार झालेल्या तिघांची अद्याप अेाळख पटलेली नाही.