शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

निमखेडीत विजेचा धक्का लागून दोन भाऊ जखमी

By admin | Updated: January 8, 2017 02:14 IST

तारेवर सुकण्यासाठी ठेवलेले कपडे काढत असताना वीजेच्या धक्क्याने दोन भाऊ गंभीर जखमी.

कोथळी(बुलडाणा), दि. ७- निमखेडी गावात तारेवर सुकण्यासाठी ठेवलेले कपडे काढत असताना विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून दोन भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.निमखेडी येथील मोहन नारायण चव्हाण व ङ्म्रावण नारायण चव्हाण हे दोघे भाऊ कुटुंबासमवेत एकमेकांच्या शेजारी राहतात. शनिवार सकाळी श्रावण चव्हाण याने आंघोळ झाल्यानंतर तारेवरील कपडे काढण्यासाठी हात लावला असता, त्याला जोरदार विजेचा धक्का बसून तो खाली पडला. हा प्रकार पाहून घरामध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी त्याची पत्नी, मुले-मुलींनी त्याला वाचविण्यासाठी धावपळ केली. गावकर्‍यांचे प्रसंगावधान व रोहित्रावरील फ्यूज त्याक्षणी उडाल्यामुळे ते सर्व जण वाचले. त्याला तत्काळ कोथळी येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, रस्ता कामासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने रोहित्रावरील फ्यूज टाकण्यात आले. त्याचवेळी ङ्म्रावण चव्हाणच्या घराला लागून असलेले त्याचे मोठे भाऊ मोहन चव्हाण यांनीसुद्धा आंघोळ झाल्यावर तारेवरील कपड्याला हात लावला असता, त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी गावचे पोलीस पाटील प्रेमदास राठोड हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी तत्काळ काठीने तार तोडून विद्युत प्रवाह खंडित केला. प्रवाहित विद्युत तार टिनपत्र्याला लागून कट झाल्यामुळे दोघा भावांच्या घरात विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता. गावकर्‍यांच्या प्रसंगावधानामुळे दोघे भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचले. संध्याकाळपर्यंत दोघा भावांची प्रकृती स्थीर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.