अपघातात दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 20:02 IST2017-10-24T20:02:14+5:302017-10-24T20:02:53+5:30
मानोरा : कारंजा ते मानोरा रोडवरील भोयणी फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी २४ आॅक्टोबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

अपघातात दुचाकीस्वार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : कारंजा ते मानोरा रोडवरील भोयणी फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी २४ आॅक्टोबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
एच.एच.२९ एके २५७७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चालक बबलु उत्तमराव गावंडे रा.चिखलागड यांनी आपला ट्रॅक्टर भरधाव व निष्काळजीपणाने चालवून एमएच ३७ एफ ६१७४ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये लक्ष्मण लबडे, पंडीत आडे जमखी झाले. जखमीचा मुलगा सचिन लक्ष्मण लबडे रा.सावरगाव बरडे यांच्या तक्रारीवरुन मानोरा पोलिसांनी भादंवी कलम २७९, ३३७, व १८४ मोटार व्हेईकल अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवा राठोड, ईश्वर बाकल करीत आहेत.