कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

By admin | Published: April 2, 2016 12:42 AM2016-04-02T00:42:29+5:302016-04-02T00:42:29+5:30

भावही गडगडले; पाण्याअभावी पिके सुकली.

Turning onion producer farmer | कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

Next

संग्रामपूर (जि. बुलडाणा): तालुक्यातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली आहे; मात्र परिसरातील विहिरी व बोअरवेलचे पाणी आटल्यामुळे या पिकाला पाणी पुरत नसल्याने कांद्याची वाढ खुंटली आहे. दुसरीकडे कांद्याचे भावसुद्धा गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरते अडचणीत आले आहेत. यावर्षी शेतकर्‍यांनी पाणीटंचाई पाहता, आधीच रब्बीचे लागवडीखालील क्षेत्र घटविले, तर ज्या शेतकर्‍यांनी दीड ते दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली, अशांनाही पिकाला देण्यासाठी पाणी कमी पडत असल्यामुळे अध्र्याच एकरातील कांद्याला पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे कठीण झाले आहे.
 

Web Title: Turning onion producer farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.