वसुली एजेंटला लुटण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:06 IST2018-10-24T13:05:59+5:302018-10-24T13:06:04+5:30
वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती.

वसुली एजेंटला लुटण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल
वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री 11 वाजता एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कुंदेगाव या गावात महिला बचत गटांच्या पैसे वसुली करीता क्रेडिड एक्जींस ग्रामीण लिमेंटेट बोगलोर च्या कंपनीचे वसुली कर्मचारी सागर रमेश तायडे वय २७ वर्ष राहणार वडोदा तालुका मुक्ताईनगर जि. जळगाव खान्देश हे कुंदेगावात वसुली करीता गेले होते. मोटर सायकलने येत असतांना त्याच्या जवळ ६०,००० रूपये ची पैसेची बॅग होती. कुंदेगावं ते कोद्री शिवारात रस्त्याने योगेश अशोक पहूरकार राहणार तेल्हारा जि. अकोला याने मोटर सायकल अडवून चाकूचा धाक दाखवून बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडा केला असता त्याने घट्नास्थळावरून पळ काढला. सागर तायडे याने तांमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी योगेश पहुरकार यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक २०६/१८ कलम ३९४ बळजबरी करून मारहाण केल्याचा रात्री उशिरा गुन्हा दाखल करला. पुढील तपास पोलिस निरीक्षक डी, बी. इंगळ ेयांच्या मार्गदर्शनाखाली पातूर्डा पोलीस चोकीचे पो.कॉ. तिवारी करीत आहेत.