नि:स्वार्थ मानवसेवेतच खरा आनंद : इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:59+5:302021-07-27T04:35:59+5:30

ते येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व वृक्षारोपणानिमित्त आयोजित ...

True happiness in selfless human service: Ingle | नि:स्वार्थ मानवसेवेतच खरा आनंद : इंगळे

नि:स्वार्थ मानवसेवेतच खरा आनंद : इंगळे

ते येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व वृक्षारोपणानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सचिव गजेंद्र भिसे व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुण पांडव उपस्थित होते. भानुदास पवार यांची मानव सुरक्षा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून, तर रफिक कुरेशी यांची जिल्हा प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी लोणार कार्याध्यक्ष म्हणून शेख जावेद, चिखली तालुका मीडिया प्रमुख सागर ठाकरे, गणेश लहाने, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष प्रवीण पऱ्हाड यांनी केले होते. आभार सुनील मोरे यांनी मानले.

मानव अधिकार सुरक्षा सेवा संघाकडून वृक्षारोपण

राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा सेवा संघाचे महासचिव गजानन इंगळे, सचिव गजेंद्र भिसे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुण पांडव, जिल्हा मीडिया प्रमुख मुन्ना काळे, जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास पवार यांच्या हस्ते वाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रकाश सुखदाने, अनिल मोरे, विजय वायाळ, उमेश शीलवंत, मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: True happiness in selfless human service: Ingle