ट्रकची दुचाकीस जबर धडक : १ ठार, १ गंभीर
By Admin | Updated: May 30, 2014 22:48 IST2014-05-30T22:26:54+5:302014-05-30T22:48:52+5:30
ट्रकची दुचाकीस धडक; ५0 वर्षीय इसम जागीच ठार तर ७ वर्षीय मुलगा गंभीर; मलकापूर जवळील घटना.

ट्रकची दुचाकीस जबर धडक : १ ठार, १ गंभीर
मलकापूर : भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने ५0 वर्षीय इसम जागीच ठार तर दुचाकीवरील ७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना नॅशनल हायवे नं.६ वर घडली. ग्राम चांदुरबिस्वा येथील राहणारे शे.बरकत शे.वजीर वय ५0 हे मलकापूर येथील लग्न सोहळा आटोपून घराकडे निघाले. दरम्यान वडनेर भोलजी जवळील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक शे.बरकत शे.वजीर वय ५0 रा. चांदुरबिस्वा हे जागीच ठार झाले. तर दुचाकीवरील अनिसखान सरदारखान वय ७ रा. चांदुरबिस्वा हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अनिसखान याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविले आहे.