शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जालना-चिखली मार्गावर ट्रक-प्रवासी बसची धडक; चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:13 IST

रोहडा फाट्याजवळ ट्रक व खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कअंढेरा:  जालना-चिखली महामार्गावर अंढेºया नजीक रोहडा फाट्याजवळ ट्रक व खासगी प्रवासी वाहतूक करणाºया बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात २५ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.सध्या जालना-चिखली मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरच अंढेºया नजीक असलेल्या रोहडा फाट्यानजीकच्या वाकानात पुण्यावरून अमरावतीकडे जाणारी राजा कंपनीची खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया बसची (एमएच-०४-एफके-६३९३) आणि जालन्याकडे जाणाºया ट्रकची  (आरजे-४७-जीए-१६०२) समोरासमोर जबर धडक झाली. त्यात बस आणि ट्रक चालकासह बसमधील दोन प्रवाशी असे मिळून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांच्या वाहनाद्वारे तत्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हा अपघात सकाळी आठ वाजेच्या सुमारास रोहडा फाट्यानजीकच्या एका वळणावर झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही जवळपास पाच ते सहा वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच दुय्यम ठाणेदार व्ही. एल. कवास, बीट जमदार निवृत्ती पोफळे, मांटे, झिने यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. सोबतच बसमधील तीनही जखमी आणि ट्रक चालक यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर रस्त्याच्या मधोमधच अपघातग्रस्त ट्रक उभा असल्याने नंतर क्रेनच्या सहाय्याने तो रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामध्ये बस व ट्रकचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

जखमीवर बुलडाण्यात उपचारया अपघातामध्ये खासगी बस चालक बाबाराव मधुकर डव्हळे (४७, रा. गाडगेनगर, अमरावती), अशोक पुंजाजी चांगाडे (५०, रा. कळंबेश्वर(ह.मु. पुणे), पांडुरंग किसन राऊत (४०, रा. सफवा, जि. हिंगोली) आमि ट्रक चालक नथ्तुराम चौधरी  (जयपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे. त्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधारक बर्डे यांनी पोलिसाच्या वाहनातून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खासगी बसमधील (स्लीपर कोच) उर्वरित प्रवाशांना किरकोळ इजा वगळता कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांना अन्य वाहनाद्वारे निर्धारितस्थळी पाठविण्यात आले. सुदैवाने अपघातानंतर बस रस्त्या लगतच्या झुडपाला अडल्यामुळे मोठे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात