राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची समोरासमोर धडक; दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 14:09 IST2019-03-21T14:08:55+5:302019-03-21T14:09:01+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवेळ गुरुवारी सकाळी 8 वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची समोरासमोर धडक; दोघे ठार
नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवेळ गुरुवारी सकाळी 8 वाजता दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही ट्रक चालक जागेवरच ठार झाले. मलकापूरकडून येणाऱ्या ट्रक (एपी07 टी)ने नांदुराकडून येणाऱ्या ट्रक (आरजे 09 जी बी 6768) ला जोरदार धडक दिली. या अपघातात शे.हुसेन (रा. गुटूर आंध्र प्रदेश) व दुसरा ट्रक ड्रायव्हर विजय गंगाराम राठोड (रा. भिकनगाव जि.खरगोन) हे दोघे ठार झाले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.