ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:16 IST2019-11-27T15:15:21+5:302019-11-27T15:16:42+5:30
वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला, तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे.

ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : सिलिंडर घेवून जाणारा ट्रक पुलावरुन कोसळल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर कोलासर फाट्याजवळ रात्री २ वाजता घडली.
बैलुतलवरून जळगाव खान्देशकडे ट्रक क्रमांक -एमपी- ०९-एचएफ -५४३२ नवीन सिलेंडर घेऊन जात होता. दरम्यान, कोलासर फाट्यानजीकच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट ३०फुट उंच पूलावरुन नदीपात्रात कोसहळा. त्यात ट्रकमधील वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती नायगावचे अजय चोपडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे देताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना येथील नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र वाहकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)