जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला
By Admin | Updated: September 17, 2014 00:54 IST2014-09-17T00:54:00+5:302014-09-17T00:54:00+5:30
बुलडाणा देऊळघाट मार्गावरील घटना; चालक फरार, दोघांना अटक.

जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला
बुलडाणा : जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा मिनी ट्रक बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई बुलडाणा-देऊळघाट मार्गावर १६ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
बुलडाणा-देऊळघाट मार्गावर बुलडाणा ग्रामीण पोलिसांची ग्रस्त सुरु असतांना या मार्गाहून एक मिनी ट्रक भरधाव वेगात जात असतांना पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस शिपाई किसन राठोड यांनी या ट्रकला थांबवून चौकशी केली. या दरम्यान ट्रकमध्ये ७ गाई अत्यंत निर्दयतेने कोंबण्यात आल्या असल्याचे दिसून आले. पोलिस चौकशी सुरु असतांना वाहनचालक घटनास्थाळाहून फरार झाला. मात्र त्याच्या दोन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनासह सर्व गाई बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला आणून तेथून गोरक्षण धाम येथे पाठविण्यात आल्या. या प्रकरणी हसनखॉ अमजद खॉ आणि शे.याकुब शे.यूसुफ रा.देऊळघाट शिवाय फरार चालकाविरोधात भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलम ११, ३ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दररोज जनावरांची अवैध वाहतूक होत असते. अनेक ट्रक धाड मार्गे औरंगाबाद येथे रवाना करण्यात येतात. अनेक प्रकरणात पोलिस चिरीमिरी घेवून ट्रक सोडून देतात. याबाबात पोलिस प्रशासनाने दखल घेवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.