सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला
By Admin | Updated: March 4, 2015 01:50 IST2015-03-04T01:50:09+5:302015-03-04T01:50:09+5:30
खामगाव जवळील घटना.

सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटला
खामगाव (जि. बुलडाणा) : भरलेले सिलिंडर घेऊन जात असलेला ट्रक उलटल्याची घटना ३ मार्च रोजी सकाळी शहरानजीक टेंभुर्णा फाट्यावर घडली. या अपघातात ट्रकचा चालक व क्लिनर जखमी झाले. एम.एच.१२ डीजी ४८0७ या क्रमांकाचा ट्रक जळगाव खान्देश येथून भारत कंपनीचे भरलेले गॅस सिलिंडर घेऊन कारंजाकडे जात होता. दरम्यान, उपरोक्त ठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक रस्त्याच्या बाजूने उलटला. यामध्ये ट्रकचालक रवींद्र पंडित रा. जळगाव खान्देश व क्लिनर असे दोघे जखमी झाले. या दोघांनाही उपचारासाठी स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.