शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणीत अडकला मोबदला

By admin | Updated: June 6, 2015 00:43 IST

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी मोबादला म्हणून मिळालेली ३१ कोटींची रक्कम बँकेत जमा.

हनुमान जगताप / मलकापूर ( जि. बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरण प्रकरणी मलकापूर शहराच्या अंर्तगत असंख्य लाभार्थी शेतकरी व व्यावसायीक मोबदल्याच्या रकमेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठीची ३१ कोटींची रक्कम बँकेत जमा असली तरी तांत्रीक अडचणीमुळे त्यापासून लाभार्थी वंचीत असल्याच दिसत असून व्यवहार थकल्याने अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणासाठी सन २0१२ पासूनच भुसंपादनाची प्रक्रीया सुरु झाली. त्यासाठीची सुचना सन २0१३ मध्ये प्रसिध्द झाली. त्या अनुषंगाने लाभार्थी शेतकरी व व्यावसायीक प्रकल्पग्रस्तांना जानेवारी २0१४ मध्येच मोबदला मिळायला पाहिजे होता. मात्र भूसंपादन करताना त्यावेळी चुका झाल्याने मुक्ताईनगर, जळगाव खान्देश याखरेजी अमरावती विभागातील अकोला आदींच्या तुलनेत मोबदला देताना मलकापूर उपविभागावर अन्याय झाल्याची ओरड अजूनही कायम असल्याच प्रामुख्याने दिसत. म्हणूनच त्या विषयीची प्रसिध्दी होवून दिड वर्ष लोटल्यावरही मोबदला नसल्याने प्रकल्पग्रस्तात नाराजीचा सूर आहे. मार्गावरील अपघातांची संख्या पाहता महामार्गाचे चौपदरीकरण गरज आहे. त्यासाठी शासनाची भूमीका योग्य आहे. वृक्षकटाई होवून चौपदरी करणाची प्रक्रीया पुढे जात आहे. मात्र अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांना मोबदला न मिळाल्यास त्यात अडचणी येवू शकतात. शहर अखत्यारितील अनेक लाभार्थी शेतकरी व व्यावसायीक प्रकल्प्रगस्तांचे व्यवहार मोबदल्यामुळे अडकले आहेत.