मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:24 IST2019-02-16T13:24:25+5:302019-02-16T13:24:45+5:30
मलकापूरः जम्मू काश्मीरमधील पलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली
मलकापूरः जम्मू काश्मीरमधील पलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याच बरोबर शहिद संजयसिंह दिक्षित राजपूत यांना शेवटचा निरोप देण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह देशभक्तांनी सकाळपासून एकच गर्दी केली.
शहरातील प्रमुख रस्त्यावर तहसील चौक,हनुमान चौक,संत गाडगेबाबा चौक,टेलिफोन काँलनी स्क्वेअर,बसस्थानक चौक, जनता महाविद्यालय,अशा विविध ठिकाणी शहिद संजयसिंह दिक्षित राजपूत यांच्या तैलचित्रे लावून मेणबत्त्या पेटवून फुले वाहण्यात आली.विशेष म्हणजे बंद असल्याने विविध समाजसेवी संस्था, मित्र मंडळे,यासह अनेकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
सकाळपासूनच मलकापूरात देशभक्त नागरिकांचे सुरू झाले.दिवसभर हिंदुस्थान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा करित देशभक्त नागरिकांचा ओघ जनता महाविद्यालयासमोरील अंत्यसंस्कार स्थळी जात होता.