बुलडाणा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: June 4, 2014 23:58 IST2014-06-04T23:47:52+5:302014-06-04T23:58:43+5:30

बुलडाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Tribute to Gopinath Munde in Buldhana District | बुलडाणा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

बुलडाणा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

बुलडाणा: ग्रामविकास मंत्री ना.गोपीनाथ मुंडे यांचे ३ जून रोजी अपघाती निधन झाले. त्यानिमित्त आज ४ जूनला जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिखली येथील भाजपा कार्यालयात स्व.गोपिनाथ मुंढे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली. डोणगाव येथे सर्व पक्षीय बंद पाळण्यात आला. दुसरबीड येथ देखील सामाजिक, राजकीय, व्यापार्‍यांसह नागरिकांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करुन दुसरबीड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मेहकर व जिल्ह्यातील अन्य ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Tribute to Gopinath Munde in Buldhana District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.