जिल्ह्यात ९६ सक्रिय रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST2021-06-19T04:23:36+5:302021-06-19T04:23:36+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव पाच, देऊळगाव राजा सहा, चिखली आठ, मेहकर एक, नांदुरा एक, लोणार ...

Treatment of 96 active patients in the district | जिल्ह्यात ९६ सक्रिय रुग्णांवर उपचार

जिल्ह्यात ९६ सक्रिय रुग्णांवर उपचार

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात बुलडाणा तालुक्यातील सहा, खामगाव पाच, देऊळगाव राजा सहा, चिखली आठ, मेहकर एक, नांदुरा एक, लोणार तीन, जळगाव जामोद तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. दरम्यान शेगाव, मलकापूर, मोताळा आणि संग्रामपूर तालुक्यात एकही जण तपासणीत कोरोना बाधित आढळून आला नाही. शुक्रवारी कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचाही मृत्यू झाला नाही. दुसरीकडे ४८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्ध रुग्णांपैकी ५ लाख ४२ हजार ५७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ८५ हजार ४१९ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

--१७७० अहवालाची प्रतीक्षा--

शुक्रवारी १ हजार ७७० संदिग्धांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. दोन दिवसांमध्ये त्याचे अहवाल प्राप्त होतील. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८६ हजार १६८ झाली आहे. यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या ९६ असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: Treatment of 96 active patients in the district