बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:13 AM2021-08-07T11:13:14+5:302021-08-07T11:13:23+5:30

Transfers of 426 police personnel in Buldana district : ३६ एएसआय, ९४ पोलिस हेडकॉन्स्टेबल, १४८ नायक पोलिस कॉन्स्टेबल, १४८ पोलिस कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश आहे.

Transfers of 426 police personnel in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

बुलडाणा जिल्ह्यातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पोलिस दलातील ४२६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरियांनी एका आदेशान्वये ६ ऑगस्ट रोजी प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.
यामध्ये ३६ एएसआय, ९४ पोलिस हेडकॉन्स्टेबल, १४८ नायक पोलिस कॉन्स्टेबल, १४८ पोलिस कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश आहे. बदल्यामध्ये पारदर्शकता राहावी व कर्मचाऱ्यांना सोयीचे स्थान मिळावे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मार्च महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये संबंधितांकडून ३ पसंतीची स्थाने ही लिहून घेण्यात आली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासंदर्भाने जिल्हा पोलिस मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याच्या आधारावर पसंतीच्या तीन स्थानापैकी एका स्थानावर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना नेमणूक देण्यात आली आहे. 
दरम्यान यामध्ये काहींना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.

Web Title: Transfers of 426 police personnel in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.