बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:44 IST2020-08-11T15:44:23+5:302020-08-11T15:44:31+5:30
मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली
खामगाव : महसूल विभागाने सोमवारी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. त्यांच्या बदलीने रिक्त होणाºया जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.
महसूल व वन विभागाच्या सर्वसाधारण बदली आदेशात राज्यातील बुलडाणा जिल्ह्यातील केवळ तीन अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये मलकापूरचे उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांची वाशिम येथे उपजिल्हाधिकारी महसूल या पदावर बदली झाली आहे. तर खामगावचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांची अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त असलेल्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदावर बदली झाली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी असलेल्या गौरी सावंत यांची वाशिम जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर बदली झाली आहे. या तीनही अधिकाºयांच्या बदलीने रिक्त होणाºया जागांवर अद्याप कोणत्याही अधिकाºयांची नियुक्ती झाल्याचा आदेश नाही. या अधिकाºयांच्या बदली आदेशानंतर त्यांना तत्काळ कार्यमूक्त करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात रिक्त होणाºया जागांवर नव्या अधिकाºयांच्या नियुक्तीचा आदेश स्वतंत्रपणे दिला जाईल, असेही नमूद केले आहे. या प्रकाराने आता महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्यांचा पोळा फुटण्याची शक्यता आहे.