ट्रेलरची प्रवासी वाहनास धडक; सात गंभीर, टाकरखेड हेलगा येथील घटना
By संदीप वानखेडे | Updated: April 25, 2023 19:19 IST2023-04-25T19:19:12+5:302023-04-25T19:19:21+5:30
उदयनगर येथून प्रवासी घेऊन एमएच ३० - पी ६०५४ हे वाहन मंगळवारी दुपारी बुलढाणा येथे जात हाेते.

ट्रेलरची प्रवासी वाहनास धडक; सात गंभीर, टाकरखेड हेलगा येथील घटना
अमडापूर (बुलढाणा) : भरधाव ट्रेलरने प्रवासी वाहनास धडक दिल्याने सात प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना उदयनगर ते बुलढाणा रस्त्याला लागून असलेल्या टाकरखेड हेलगा येथे २५ एप्रिल राेजी घडली.
उदयनगर येथून प्रवासी घेऊन एमएच ३० - पी ६०५४ हे वाहन मंगळवारी दुपारी बुलढाणा येथे जात हाेते. दरम्यान, टाकरखेड हेलगा गावाजवळ उदयनगरकडे येणाऱ्या ट्रेलर क्र. एमएच ०४ - डीडी ९७५१ ने प्रवासी वाहनास समाेरासमाेर धडक दिली. या अपघातात प्रवासी वाहनातील विमल मोतीराम नेमाडे, वेणूबाई उत्तम नेमाडे (रा. अमडापूर), अश्विनी विनोद भामद्रे, विनोद भामद्रे (रा. निमगाव), वच्छलाबाई मेसेरे, लक्ष्मण मेसेरे (रा. गणेशपूर), शोभाबाई सखाराम नेमाडे (रा. चांडोल) आदी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ व पाेलिसांनी जखमींना तातडीने प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. यातील काही जखमींना खामगाव येथे हलविण्यात आले आहे.