नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:39 AM2020-04-22T11:39:52+5:302020-04-22T11:40:06+5:30

येत्या आठवडाभरात पालिका कामगारांचा विमा न उतरविल्यास कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला.

Trade unions aggressive for life insurance of municipal employees! | नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक!

नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील कामगारांना सुरक्षा देण्यासाठी त्यांचा जीवन विमा उतरविण्यासाठी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात पालिका कामगारांचा विमा न उतरविल्यास कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्याचवेळी शासनाच्या दुजाभावाचाही निषेध संघटनांकडून करण्यात येत आहे.
राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला. मात्र, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतीतील सफाई कामगारांसह इतरही कर्मचाºयांचा विमा उतरविला नाही. राज्यातील नगर पालिका, नगर पंचायत आणि महापालिका क्षेत्रातील कामगार संघटनांमध्ये तीव्र निषेध व्यक्त होत आहे. कोरोना फायटर्स म्हणून लढणारे पालिका कर्मचारी संकटात सापडले आहेत. महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सफाई, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी राज्यातील ३६३ शहरात सेवारत आहेत.
गत महिनाभरापासून सफाई कामगाराचा जीवन विमा काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी नगर पालिका क्षेत्रातील कामगार संघटना आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.
आपातकालीन परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाºया कामगारांनी यासंदर्भात एक रणनितीही आखली आहे.
 

कर्मचाºयांचा जीवन विमा उतरवित असताना शासनाकडून दूजाभाव करण्यात आला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सेवारत असलेल्या कामगारांचा विमा न उतरविल्यास कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.
- मोहन अहीर
सदस्य, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना

Web Title: Trade unions aggressive for life insurance of municipal employees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.