शेगाव (जि. बुलडाणा): नागझरी रोडवरील जुने महादेव मंदिर परिसरात नाल्यावरील पुलावरून ट्रॅक्टर उलटल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली. यात चालक जखमी झाला आहे. शेतात जात असलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३0-६४५६ अरुंद रस्त्यामुळे पुलावरून नाल्याच्या पात्रात उलटला.या अपघातात जीवितहानी टळली. मात्र ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे. सदर पुलावरून काही दिवसांपूर्वीच एक कारदेखील उलटली होती. हा पूल विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आला असून, पुलाला कठडे नसल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुलावरून ट्रॅक्टर उलटला; चालक जखमी
By admin | Updated: July 7, 2016 02:34 IST