संतनगरीत सुट्यांमुळे पर्यटकांची मांदियाळी

By Admin | Updated: May 20, 2017 00:50 IST2017-05-20T00:50:19+5:302017-05-20T00:50:19+5:30

शेगाव : विदर्भाची पंढरी शेगाव श्री गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्याने अगणित लाखो भक्तांचे आकर्षण केंद्र बनली आहे.

Tourist places | संतनगरीत सुट्यांमुळे पर्यटकांची मांदियाळी

संतनगरीत सुट्यांमुळे पर्यटकांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भाची पंढरी शेगाव श्री गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्याने अगणित लाखो भक्तांचे आकर्षण केंद्र बनली आहे. संस्थानला आनंद सागर अध्यात्मिक केंद्र मनोहारी उद्यान या प्रकल्पाने तर संतनगरी शेगावचे नाव तर जगाच्या नकाशावर झळकले आहे. सुट्टीच्या काळामध्ये आनंद सागर पीकनिक पॉर्इंट बनला आहे. या सुटींच्या कालावधीत तर प्रती दिवसाला हजाराच्या वर भक्तगण आनंद सागरचा आनंद लुटतात. आनंद सागरमध्ये लहान मुलांचे विशेष खेळणी विभाग आहेत. मत्सालय तर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विविध जातीच्या, विविध रंगाच्या प्रकाराच्या मासोळ्या पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. पर्यटकांना कॉफी हाऊस नास्त्यासाठी उपहारगृह, भोजनालय आदींची सुनियोजनपूर्वक आनंद सागरात उपलब्ध आहेत. यामध्ये श्री शिवशंकर मंदिर, श्री नवग्रह मंदिराची मोठ्या आकर्षकरीत्या संगमवरवरी पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये बांधणी केलेली आहे.
पर्यटकांनी आनंदसागरचे अवलोकन केल्यानंतर शेवटी जाता जाता संगीताच्या तालावर भक्तीसंगीताच्या निनादात लयबद्ध पाण्याचे उंच उंच विविध रंगाने नटलेले फवारे पाहताना तर भक्तगण भक्तीरसात तल्लीन होतात.
आनंद सागरला भक्तांच्या सेवेत तब्बल १४ वर्षे झालेले आहेत. ९ फेब्रुवारी २००३ ला लोकार्पण झाले. प्रतिदिन ७ ते १० हजार भक्तगण या मनोहारी उद्यानाचे अवलोकन करतात.
परीक्षेनंतरच्या सुट्या, नाताळच्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये भक्तांची मांदियाळी संतनगरीत, आनंद सागरात दिवसेंदिवस वाढत आहे. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत अवलोकन करणारे भक्त हे पंचवीस लाख होते, हे विशेष.

Web Title: Tourist places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.