लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By Admin | Updated: January 12, 2017 03:58 IST2017-01-12T03:58:59+5:302017-01-12T03:58:59+5:30
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी युवकावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
खामगाव (बुलडाणा) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी युवकावर गुन्हा दाखल करुन अटक केली.
स्थानिक समता कॉलनी भागातील रहिवासी २२ वर्षीय युवतीला जलंब येथील किशोर दिनकर घोपे (वय २६) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सन २०१२ पासून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले; मात्र सदर युवतीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.अशी तक्रार पीडित युवतीने पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपीस अटक केली. (प्रतिनिधी)