२८ वर्षीय कुमारीकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:02 IST2021-03-13T05:02:42+5:302021-03-13T05:02:42+5:30

गत चार महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार होत होते. प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. चिखली तालुक्यातील एका गावातील ही घटना ...

Torture of 28 year old virgin | २८ वर्षीय कुमारीकेवर अत्याचार

२८ वर्षीय कुमारीकेवर अत्याचार

गत चार महिन्यांपासून पीडितेवर अत्याचार होत होते. प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. चिखली तालुक्यातील एका गावातील ही घटना आहे. यातील २८ वर्षीय पीडिता ही तिच्या आईसोबत राहते. घरकाम करून त्या उदरनिर्वाह करतात. पीडितेला एक आजार असल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती. त्यामुळे तिचे लग्नही झाले नव्हते. पीडितेची एक बहीण विवाहित व गर्भवती आहे. दरम्यान पीडितेच्या लहान बहिणीचा पती प्रशांत बनसोड हा लॉकडाऊनमध्ये बेराजेगार झाल्याने ते दोघे गावीच रहावयास आले होते. यादरम्यान पीडितेची आई व बहीण पहाटे नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेल्या असता आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. डिसेंबर २०२० पासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान पीडिता गर्भवती राहल्याने तिला त्रास होऊ लागला. तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले असता हा प्रकार समोर आला. प्रकरणी ८ मार्च रोजी चिखली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Torture of 28 year old virgin