शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
3
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
4
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
5
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
6
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
7
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
8
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
9
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
10
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
12
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
13
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
14
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
15
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
16
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
17
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
18
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
19
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
20
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांची लाच घेताना अव्वल कारकुनास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:29 IST

Bribe Case उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनास ३ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

ठळक मुद्दे दीपक शंकरराव गोरे (४२) असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव.तो वाशिम शहरातील गणेश पेठमधील रहिवाशी आहे.

 बुलडाणा: कंत्राटदाराचे थकित देयक काढून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनास ३ मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दीपक शंकरराव गोरे (४२) असे लाच स्वीकारणाऱ्या आरोपीचे नाव असून मुळचा तो वाशिम शहरातील गणेश पेठमधील रहिवाशी आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

बुलाडणा येथील प्रचार व प्रसिद्धी कंत्राटदार असलेल्या एकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचे शासकीय कामकाजाचे थकीत असलेले देयक वरिष्ठांना सादर करून काढून देण्यासाठी सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ४२ वर्षीय अव्वल कारकून (वर्ग ३) दीपक शंकरराव गोरे याने कंत्राटदारास एक लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी दीपक शंकर गोरे हा सध्या सिंदखेड राजा येथेच राहत होता. तो मुळचा वाशिम शहरातील गणेशपेठमधील रहिवाशी आहे. दरम्यान, दोन मार्च रोजी पडताळणीत लाच मागितल्याचे समोर आले होते. त्यानुषंगाने तीन मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेचा ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी दीपक शंकरराव गोरे यास रंगेहात पकडले. सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लाच स्वीकारताना ही कारवाई एसीबीच्या पथकाने केली. या कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, विजय मेहेत्रे, विनोद लोखंडे, चालक मधुकर रगड, अर्शीद शेख यांनी सहभाग घेतला होता. त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड (अमरावती परीक्षेत्र) आणि अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी हे करीत आहेत. दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणSindkhed Rajaसिंदखेड राजाCrime Newsगुन्हेगारी