टोमॅटोचा ट्रक उलटला
By Admin | Updated: August 10, 2015 00:52 IST2015-08-10T00:52:58+5:302015-08-10T00:52:58+5:30
दोन जण जखमी, दीड लाख रुपयांचे नुकसान; अंजनीखुर्द येथील घटना.

टोमॅटोचा ट्रक उलटला
अंजनीखुर्द ( जि. बुलडाणा ): नागपूरकडे टोमॅटो घेऊन जात असलेला ट्रक अंजनीखुर्द येथील एका ढाब्यानजीक उलटल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा ते मेहकर रोडवरील अंजनीखुर्द येथील एका ढाब्यानजीक टोमॅटोचे ४00 कॅरेट भरुन नागपूरकडे घेऊन जात असलेला ओ.डी.१५ सी. 00२९ क्रमांकाचा ट्रक पलटी झाला. चालक भिमराज व वाहक प्रधान हडू हे जखमी झाले आहेत, तर टोमॅटो व ट्रकचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर ट्रक ओडिसा (संबलपूर) येथील राकेशप्रसाद यांच्या मालकीचा आहे.